अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई; जळगावात पोलिसांनी उतरवली तरुणाची ‘नशा’

जळगाव : दिवसेंदिवस तरुणाईमध्ये वाढत जाणारी अमली पदार्थांची ‘नशा’ उतरविण्यासाठी पोलिसांकडून अशा पदार्थांची वाहतूक करणारे व सेवन करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. यात कारवाईचा धडाका लावात अमली पदार्थ गांजाचा नशा करणाऱ्या एका तरूणाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील मेहरूण ट्रॅक परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील मेहरूण ट्रॅक परिसरात काही तरूण हे आमली पदार्थ गांजा हा चिलमच्या मदतीने नशा करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मेहरूण ट्रॅकवर छापा टाकला. यावेळी रिषभ राजेश मंदान (२३ रा. आदर्श नगर, जळगाव) हा तरूण नशा करताना आढळून आला.

दरम्यान,  त्याला पोलिसांनी ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात हजर केले. पोकॉ नितीन ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.