अमळनेरात गुणवंत शिक्षकांचा सत्कार

अमळनेर : येथील साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फाऊंडेशनतर्फे गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. साने गुरुजी नुतन विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक एस.डी.देशमुख अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून मारवड हायस्कूलचे निवृत्त प्राचार्य बी.एस.पाटील, तालुका विज्ञान मंडळाचे कार्याध्यक्ष तथा पिंपळे हायस्कूलचे विज्ञान शिक्षक जे.एस.पाटील, शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, ग.स. पतपेढीचे माजी संचालक वाल्मिक पाटील व बाजार समितीचे माजी संचालक डी.ए.धनगर आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन डॉ. कुणाल पवार यांनी केले. काटे पॅलेसमधील शिवशाही फाऊंडेशन कार्यालयात हा सत्कार कार्यक्रम पार पडला. यात महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त उमेश काटे, राष्ट्रीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक पुरस्कार प्राप्त निरंजन पेंढारे, बहिणाबाई चौधरी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ईश्वर महाजन,मौलाना अबुल कलाम आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ए.बी.धनगर, महात्मा फुले पुरस्कार प्राप्त शरद पाटील, नेट परीक्षा उत्तीर्ण प्रदिप कंखरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचचे ज्येष्ठ सदस्य रामकृष्ण बाविस्कर, रत्नाकर पाटील, सुनिता पाटील, दत्तात्रय सोनवणे, विजय पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, रविंद्र पाटील, गणेश बोढरे, विलास पाटील, राजेंद्र पाटील, गोपाल हडपे, विशाल देशमुख, बापूराव ठाकरे, सुधीर चौधरी, वेदांत सोनवणे व शाहूराजे काटे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे , मंचचे समन्वयक दत्तात्रय सोनवणे व सदस्य यांनी परीश्रम घेतले.