बिग बीं अमिताभ बच्चन यांनी पाच दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहेत.चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत अमिताभ बच्चन यांचा 81 वा वाढदिवस खूप खास असणार आहे, ज्यामध्ये त्यांच्या काही संस्मरणीय वस्तूंचा लिलाव होणार आहे. बिग बींच्या वाढदिवसाला खास बनवण्यासाठी एका ऐतिहासिक लिलावाची व्यवस्था केली जात आहे. हा लिलाव द्वारे आयोजित केला जात आहे. ‘बचनेलिया’ हा लिलाव 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
अमिताभ बच्चन यांच्या वस्तूंच्या लिलावात शो कार्ड सेट, फिल्म पोस्टर्स, छायाचित्रे, लॉबी कार्ड्स, फिल्म बुकलेट आणि त्यांच्या निवडक ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘फरार’ आणि ‘शोले’ या मूळ कलाकृतींचा समावेश आहे. एवढेच नाही तर ‘शोले’च्या यशानंतर रमेश सिप्पी यांनी कलाकारांसाठी आयोजित केलेल्या खास पार्टीची छायाचित्रेही या लिलावात असतील.
याशिवाय ‘मजबूर’ चित्रपटाचे दुर्मिळ पोस्टर्स, ‘मि. नटवरलाल, ‘द ग्रेट गॅम्बलर’, ‘कालिया’, ‘नसीब’, ‘सिलसिला’ आणि प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेले अमिताभ यांच्या दुर्मिळ स्टुडिओ पोर्ट्रेटचाही लिलाव होणार आहे. वयाच्या ८१ व्या वर्षीही अमिताभ बच्चन चित्रपटांमध्ये खूप सक्रिय आहेत. लवकरच ते ‘गणपत’ आणि ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. टायगर श्रॉफ स्टारर ‘गणपत’ 20 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे, तर ‘कल्की 2898 एडी’ 12 जानेवारी 2014 रोजी पडद्यावर येणार आहे.