मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार यंदा महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. २४ एप्रिल रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातील दिग्गज व्यक्तींचा सत्कार केला जातो.
३४ वर्षांपासून २१२ व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. २०२२ पासून यात भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ विशेष लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जातो.२०२२ चा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता. तर दुसऱ्या वर्षी २०२३ मध्ये आशा भोसले या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या. यंदा हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना दिला जाणार आहे.
अन्य विजेत्यांमध्ये ए. आर. रहमान (संगीत), गालिब नाटक (मोहन वाघ पुरस्कार), दीपस्तंभ फाऊंडेशन मोनोबल (समाजसेवा), मंजिरी फडके (साहित्य), रुपकुमार राठोड (गायन), भाऊ तोरसेकर (राजकीय पत्रकारिता), अतुल परचुरे (कला अभिनय), रणदीप हुड्डा (चित्रपट निर्मिती) यांचा समावेश आहे.