---Advertisement---

अमित शहांचा महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित ; जळगाव दौराही रद्द

---Advertisement---

जळगाव । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह येत्या 15 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या उपस्थितीत जळगाव, छत्रपती संभाजीनगरसह इतर ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे. दौऱ्याच्या दोन दिवसांआधीच त्यांचा दौरा स्थगित करण्यात आला आहे. त्यांचा दौरा स्थगित होण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

अमित शाह यांचा 15 फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्याचा दौरा होता. मात्र अमित शाह यांचा हा जळगाव जिल्ह्याचा दौरा रद्द झाला आहे. खाजगी कारणांमुळे हा दौरा रद्द झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अमित शाह यांचा दौरा स्थगित झाल्याच्या बातमीला जिल्हा प्रशासनाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे. अमित शाह पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र त्यांचा हा दौरा सुद्धा स्थगित झालाय. त्यामुळे आता अमित शहा यांचा पुढील दौरा कधी होतो याकडे लक्ष लागलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---