अमित शहा यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवणार? राहुल गांधींना झारखंड हायकोर्टाचा मोठा झटका!

झारखंड: २०१८ मध्ये अमित शाह यांच्या विरोधात टिप्पणी केल्याप्रकरणात कोर्टाने निर्णय देताना राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.

राहुल यांनी 2018 मध्ये बेंगळुरूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राहुल गांधी यांनी ट्रायल कोर्टमध्ये सुरू असलेली कारवाही रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. १६ फेब्रुवारी रोजी राहुल गांधी यांच्याकडून लिखीत बाजू कोर्टात मांडण्यात आली होती. यानंतर जस्टिस अंबुज नाथ यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. राहुल गांधी यांनी एमपी एमएलए कोर्टाने जारी केलेल्या समन्सविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.