अमेरिका वाशिंग्टन : व्हाईट हाऊसमधील आजचे भव्य स्वागत 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. भारताचे पंतप्रधान तीस वर्ष आधी अमेरिकेत आलो होतो .त्यानी व्हाईट हाऊस बाहेरून पाहिले होते. मी अमेरिकेत अनेकदा आलो पण इतक्या मोठ्या देशात भारतीयांसाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे पहिल्यांदाच उघडलेले आज मी पाहिले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हती हाऊस मध्ये केले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, 22 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. बायडेन यांच्याशिवाय उपराष्ट्रपती कमला हॅरिस, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दोन्ही देशांना विविधतेचा अभिमान केला गेला .
आमच्या दोन्ही देशांना आमच्या विविधतेचा अभिमान वाटतो, असे भारताचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. आम्ही दोघेही ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ या मूलभूत तत्त्वावर विश्वास ठेवतो. मोदी म्हणाले की, भारतीय समाजातील लोक त्यांच्या मेहनतीने आणि समर्पणाने अमेरिकेत भारताचा मानसन्मान वाढवत आहेत.
त्याआधी बोलताना राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले की, अमेरिका 15 वर्षांनंतर भारतासाठी पुन्हा एकदा राजकीय यात्रा करीत आहे, ही आमच्यासाठी सन्मानजनक बाब आहे. मी उपराष्ट्रपती असताना पंतप्रधान मोदींचा बराच काळ मला सहवास लाभला. मी राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून ते संबंध मी कायम ठेवले आहे. भारत आणि अमेरिका प्रत्येक विषयावर एकत्र काम करीत आहेत. हे सर्व भारत, अमेरिका आणि जगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आम्ही जे काही निर्णय घेऊ ते येणार्या पिढ्यांवर परिणामकारक ठरणार आहेत. दोन्ही देश गरिबी निर्मूलन, आरोग्य सेवेचा विस्तार, हवामानातील बदलांना संबोधित करणे आणि युक्रेनविरुद्ध रशियाच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या अन्न आणि ऊर्जा असुरक्षिततेचा सामना करण्यासाठी एकत्र काम करीत आहोत, असेही बायडेन म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकाचे राष्टअध्यक्ष जो बायडन यांनी अनेक महत्व पूर्ण विषयांवरती चर्चा केली .