अयोध्या: राम मंदिराबाबत देशातील जनता आणि रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे तसेच मंदिराच्या उद्घाटनाची तयारीही जोरात सुरू आहे. २२ जानेवारीला मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. यावेळी अयोध्येत सर्वसामान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पृष्ठभूमीवर अनेक कंपन्यांनीही तयारी जोरात सुरू केली आहे. विशेषतः एफएमसीजी आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना यामध्ये मोठी संधी दिसत आहे.
अयोध्येत उभारले जाणारे राम मंदिर हे देशातील सर्वात महत्त्वाचे धार्मिक केंद्र आणि तीर्थक्षेत्र असणार आहे. रामजन्मभूमी मंदिरावर कोट्यवधी लोकांची श्रद्धा असून, या मंदिराच्या उभारणीची प्रतीक्षा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात अयोध्या हे धार्मिक पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचे मोठे केंद्र बनणार आहे. ज्याचा फायदा येथील अर्थव्यवस्थेला होईल. या बदलात लाखो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. एफएमसीजी कंपन्या आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठीही संधी निर्माण होत आहेत. येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू होणार आहेत.