देशाच्या इतिहासात २२ जानेवारीची नोद सुवर्णाक्षरांनी केली गेली, कारण, भारतातील कोट्यवधी जनतेच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा हा विजय दिवस होता. संपूर्ण देशात त्या दिवशी दिवाळी साजरी केली गेली, चंद्रपूरही राममय झाले होते. या महानगराने अयोध्येच्या या महामहोत्सवात विक्रमी असे योगदान दिले. जेव्हा केव्हा अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उल्लेख होईल, तेव्हा तेव्हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पा नगराच्या विक्रमी योगदानाचाही उल्लेख होत राहील. प्राणप्रतिष्ठेच्या अगदी पूर्वसंध्येला चंद्रपूरकरांनी तब्बल ३५ हजार पणत्या प्रज्वलित केल्या आणि बघता बघता पेधील चांदा क्लब मैदानावर ‘सिपावर रामचंद्र की जप’ ही ११ अक्षरी दीपाक्षरे अवतरित झाली. एकमुखी जपघोष झाला. असे जगाच्या पाठीवर कधीच झाले नसल्याने याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डने घेतली आणि चंद्रपूरच्या नावे हे अनोखे विक्रम नोंदले गेले.
या उपक्रमाची संकल्पना आणि कार्यान्वयन अर्थात, चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्यांच्या असिम रामभक्तीचा महोत्सव एक नव्हे, तर तीन दिवस पा जिल्ह्याने अनुभवला. कल्पकता मुनगंटीवारांकडून शिकली पाहिजे. कारण, अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवादरम्यान चंद्रपूर जिल्हा काप करेल तर रामनामाचा विक्रम करेल. सोबतच जगप्रसिद्ध ताडोबाच्या जंगलात संवर्धनाच्या हेतूने ‘जटापू, अर्थात गिधाड सोडेल जटायूचे रामायणातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, हा पक्षी देशातून नामशेष होऊ लागला आहे. एकेकाळी लाखोंच्या संख्येत असणान्या आणि स्वच्छतादूत म्हणून ओळखल्या जाणान्या या गिधाडांची संख्या आता केवळ ६० हजारांवर आली आहे. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहेच, पग त्यासाठी वेळ कोणती साधली जावी, तर अयोध्येतील महामहोत्सवाची: जेणेकरून अवघ्या देशाला पा पक्ष्याचे महत्त्व कळेल, ही कल्पना सुखावणारी आहे. त्यासाठी मुनगंटीवारांचे कौतुक केले पाहिजे.
राजस्थानातून आणलेले १० जटायू एव्हाना ताडोबात पोहोचले आहेत. तीन महिने या वातावरणात त्यांचा अभ्यास केला जाईल आणि पुढे आणखी जटापू आणून तिकडे निसर्गमुक्त केले जाणार आहेत.यासोबतच चंद्रपुरात मुनगंटीवारांच्या पुढाकाराने सुप्रसिद्ध अभिनेता पुनित इस्सार याचे रामायण नाट्य, तबला वादक अनुराधा पाल आणि सुभाष नकाशे पांचे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या आतषबाजीचे देखावे आयोजित करण्यात आले, ज्याचा आनंद पेधील जनतेने घेतला, अवधी नगरी रोषणाईने न्हाऊन निघाली होती. केवळ एवढेव चंद्रपूरचे या महोत्सवासाठी योगदान नव्हते, तर पाच भूमीतून अयोध्येच्या भव्य राम मंदिरासाठी सर्वोत्तम दर्जाच्या सागवानाचे काष्ठ पाठवले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा झात्यानंतर आयोजित कार्यक्रमात राम मंदिर विश्वस्त समितीचे सचिव बंपत राप पानी, मंदिरासाठी लागणारे ताकूड हे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पेधून आणले गेले आहे, असा जाहीर उल्लेख केला. त्यावेळी या जिल्ह्यातील रामभक्तांचे ऊर अभिमानाने भरून आले असेल मोठ्या थाटात मिरवणुकीसह विधिवत पूजन करून हे काष्ठ त्यावेळी अयोध्येकडे रवाना झाले होते.
रामललाच्या भव्य मंदिरासाठी चंद्रपूरची ही भेट ऐतिहासिकच ठरणार आहे. पा निमित्ताने चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील सागवानाचे लाकूड हे जगात सर्वात उत्तम असल्याचेही अधोरेखित झाले आहे. कारण, रामाच्या भव्य मंदिरात लागणारे विविध साहित्य देशभरातील उत्तमात उत्तम असेच आहे आणि त्या त्या भागाला या मंदिराच्या उभारणीत योगदानाची महत्त्वाची संधी देणारे आहे. अशीच संधी चंद्रपूरला मिळाली, ही या जिल्हावासीयांचे भाग्पच, हे काष्ठ अयोध्येस पाठविण्याचे भाग्य लाभल्याने सुधीर मुनगंटीवार स्वतःला भाग्यवान रामभक्तम्हणून गौरवान्वित करतात. सोबतच या भूमीचे सुपुत्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेप्रसंगी मंदिराच्या गर्भगृहात उपस्थित होते, हीसुद्धा चंद्रपूरकरांसाठी अपार आध्यात्मिक समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. अयोध्येसाठी चंद्रपूर नगरीने दिलेले हे पोगदान पेथील जनतेच्या सदैव स्मरणात राहणारे आहे, नव्हे गौरवाची अनुभूती
देणारे असेच आहे.
९८८१७१७८३२