---Advertisement---

अयोध्या: रामलल्ला विराजमान होणार सुमेरू पर्वतावर, या रत्ना पासून बनवला जाईल पर्वत

by team
---Advertisement---

अयोध्या: रामलल्लाच्या अभिषेकची अयोध्येमध्ये जोरदार तयारी सुरु झाली आहे. रामलल्ला न पहिली आरती पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे.  दरम्यान, काशी विद्वत परिषदेने राममंदिर ट्रस्टकडे रामललाचे सिंहासन म्हणून नवरत्नांचा प्रस्ताव ठेवला आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात नवरत्नांनी बनवलेल्या सुमेरू पर्वतावर रामललाचे विराजमान होणार आहे. हिरा, पन्ना आणि माणिक यांसारख्या मौल्यवान रत्नांपासून सुमेरू पर्वत तयार केला जाईल.

श्री राम मंदिर बांधकाम समितीची दोन दिवसीय बैठक शनिवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी रामजन्मभूमी संकुलातील मंदिरासह बांधकाम सुरू असलेल्या दहा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिर बांधकामाची पाहणी केली. ट्रस्टने जारी केलेल्या निवेदनानुसार 20 ते 22 जानेवारीपर्यंत भाविकांना रामललाचे दर्शन घेता येणार नाही.

 

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment