अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर उभारणार भव्य राम कथांचे विशाल संग्रहालय

अयोध्या : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. हा निर्णय सर्वांच्या साक्षीने घेण्यात आला आहे, अशी माहिती तिर्थक्षेत्राचे खजिनदार महंत गोविंद देवगिरी यांनी गुरावारी दिली होती. महंत श्री गिरी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारत्मा अशोक सिंघल अयोध्येत आले आहेत. प्रभू श्रीरामाचे चरित्र हे भाविकांना समजावे. त्याचा त्यांनी अभ्यास करावा असा एक हेतू यामागे असल्याची भावना व्यक्त केली गेली आहे.

प्रसारमाध्यमाशी बोलत असताना त्यांनी सांगितले की, राम मंदिराच्या तळमजल्यावर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. तर राम दरबारच्या पहिल्या मजल्यावर राम दरबारचा अभिषेक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच दुसऱ्या मजल्यावर प्रभू श्रीरामाच्या चरित्रावर या पुस्तकांच्या माध्यमातून लिहिलेले ग्रंथ एकत्रित करून एक विशाल ग्रंथालय तयार करण्यात येणार आहे.

यामध्ये प्राचीन हस्तलिखितांव्यतिरिक्त देशातील विविध भाषांमधील रामायण आणि इतर विद्वानांचे प्रकाशित पुस्तकांचा आणि रामलल्लांच्य़ा चारित्र्यावरील ग्रंथ आणि संशोधनात्मक ग्रंथांचा यामध्ये समावेश असेल. सध्या दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम सुरू असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.