अयोध्येत दाखल झाले पहिले प्रवासी विमान

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची उलटगणना सुरू झाली आहे. २२ जानेवारी रोज पंतप्रधान नरेंद्र मोदी या भव्य मंदिरा लोकार्पण करतील. दरम्यान, शनिवा येथील वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणानंतर येथे इंडिगोचे विमान दिल्लीहून दाखल वैमानिक आशुतोष शेखर यांनी  अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांचे दिल्ली येथे विमानात स्वागत केले. इंडिगोच्च या खास उड्डाणाचे सूत्र सांभाळण्यार्च संधी मिळाली. मी खरोखरच भाग्यश आहे. माझ्यासाठी तसेच माझ्या कंपनीसाठी ही गर्वाची बाब आहे.

आमच्यासोबतचा प्रवास आनंददायी ठरला, अशी अपेक्षा करतो, अशी उ‌द्घोषणा त्यांनी प्रवाशांसोबत ‘जय ‘श्रीराम’च्या घोषणा देत संपवली.अयोध्या विमानतळावरही प्रवासी जय श्री राम’च्या घोषणा देत होते. याची एक चित्रफीत समोर आली आहे. या व्यतिरिक्त अयोध्येत उतरल्यावरही प्रवाशांनी घोषणा दिल्या.