अयोध्येत येणार जल मेट्रो, पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण

अयोध्या: रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस आता जवळ येत आहे. देशभरातील रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असताना, आता त्यात आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे. अयोध्येतील शरयू नदीत लवकरच जल वाहतुकीला सुरुवात होणार आहे.अर्थात् जल मेट्रो सुरू होणार आहे. उत्तरप्रदेशातील ही पहिलीच जल मेट्रो असणार आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला अयोध्येत येणार आहेत. त्यांच्याच हस्ते या जल मेट्रोचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या जल मेट्रोची निर्मिती कोची शिपयार्डमध्ये करण्यात आली असून, ती कोचीहून अयोध्येकडे खाना करण्यात आली आहे. जलमागनि ती कोलकात्याहून पाटणामार्गे अयोध्येत पोहोचेल. मेट्रोसाठी दोन जेट्टी कोलकात्याहून रामनगरीत पोहोचत्या आहेत. शरयूवरील घाट आणि मेट्रो या दरम्यान प्रवास करण्यासाठी या जेट्टीचा वापर करण्यात येणार आहे. यातील एक जेट्टी नया घाट आणि दुसरी गुप्तार घाट येथे उभी करण्यात येणार आहे. जेट्टीसोबत आलेले भारतीय अंतर्देशीय जलमार्ग

पर्यटनाला मिळणार प्रोत्साहन या जल मेट्रोमुळे अयोध्येत धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे. भविष्यात या मेट्रोचे संचालन उत्तरप्रदेश सरकार करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलमार्ग प्राधिकरण स्थापन करून, याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला होता. शरयू नदीतील जलवाहतूक हा त्याचाच एक भाग आहे. नजीकच्या भविष्यात नया घाट ते गुप्तार घाट या मार्गावर कॅटामरान नौका सुरू करण्याचेही नियोजन आहे. प्राधिकरणाचे पथक अयोध्येत पोहोचले आहे. जल मेट्रोचे आगमन १४ किंवा १५ जानेवारीला होणार असल्याचे प्राधिकरणाचे उपाध्यक्ष सुनीलकुमार सिंह यांनी सांगितले.