अयोध्या : अयोध्येत जानेवारी महिन्यात भव्य श्रीरामललांचे मंदिर उभारल्यानंतर आता या नगरीचा नूरच पालटला आहे. भाविक आणि विदेशी पर्यटकांचा ओघ वाढतच आहे. अयोध्येच्या सौंदर्यात आणि पर्यटनव्यवसायात आणखी मोठी भर घालण्यासाठी भव्य निलायम पंचवटी द्वीप साकारला जाणार आहे. अयोध्येत नुकतेच या योजनेचे अनावरण करण्यात आले. येथे येणाऱ्या पर्यटकांना प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्राशी संबंधित प्रसंगांना साकारले जाणार आहे.
याची रचना अशी असेल की, येणाऱ्यांना त्रेतायुगात असल्याची अनुभूती आत्याशिवाय राहणार नाही. या योजनेचे प्रभारी राज मेहता यांनी सांगितले की, या द्वीपाच्या उभारणीवर तब्बल १०० कोटी रुपये खर्च येणार आहे. अयोध्येच्या गुप्तारघाट येथे निलायम पंचवटी द्वीप आकाराला येईल. रामललाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांना त्यांच्या जीवनदर्शनाची अनुभूती मिळणार आहे. शासनाच्या सहकायनि ही योजना साकारली जात आहे. आध्यात्मिक अनुभूतीसह पर्यटनाचा आनंद आणि मनःशांती अशा सर्व उद्दिष्टाची पूर्तता व्हावी, असा प्रयत्न या योजनेद्वारे केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
निलायमची वैशिष्ट्ये….
शेणावर आधारित जैविक शेतीला प्रोत्साहन
कचरा आणि टाकावू वस्तू पुनर्वापर प्रकल्प तसेच दूषित
पाण्याचा शुद्धिकरण प्रकल्प
आयुर्वेदिक औषधी रोपवाटिका
विविध आजारांवर उपचारासाठी योगसाधना केंद्र
मातीच्या भांड्यांची तसेच खेळण्यांची अनोखी बाजारपेठ
प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित मूर्ती, ध्वनिचित्रफिती
• सांस्कृतिक भजनसंध्या, उंटावर रपेट, घोडस्वारी, सनसेट पॉईंट
नौकायन, पॉवर बोट स्पोर्ट्स
वैदिक गावाची अनुभूती देणाऱ्या १०८ पर्णकुटी
• शुद्ध शाकाहारी भोजन प्रसाद आणि गायीच्या तूपातील व्यंजनांची व्यवस्था