नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची घोषणा त्यांनी स्वतः सोशल मीडियावर केली आहे. खरे तर पक्षाचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नुकताच आम आदमी पक्षाने केला होता. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. दिल्ली विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढवण्यात आले आहे.
सीएम केजरीवाल यांनी सोशल मीडिया X वर लिहिले की, “आज मी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे.” दरम्यान, उपराज्यपालांच्या अभिभाषणात व्यत्यय आणल्याबद्दल दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी सात आमदारांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले.