अरविंद केजरीवालांच्या अटकेवर काय म्हणाले अण्णा हजारे ?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. गुरुवारी दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्याला अटक केली. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. ज्यांच्यामुळे केजरीवाल मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले, त्या अण्णा हजारे यांनी केजरीवालांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अण्णा?
अण्णा हजारे म्हणाले की, केजरीवाल यांच्यासारखा माणूस आधी माझ्यासोबत काम करायचा. तेव्हा आम्ही दारुविरोधात आवाज उठवायचो. परंतु आता मात्र ते दारु धोरण बनवत आहेत. मला या गोष्टीचं खूपच दुःख झालं आहे. परंतु करणार काय? सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नाही.

अण्णा पुढे म्हणाले की, दारु धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक झालीए, हे सगळं त्यांच्या कृतीमुळे झालं आहे. त्यांनी ते सगळं केलं नसतं तर अटकेचा संबंधच नव्हता. आता जे होईल ते कायद्याच्या दृष्टीने होईल. अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.