---Advertisement---

अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान आज अयोध्येत जाऊन घेतील श्रीरामांचे दर्शन.

by team
---Advertisement---

अयोध्या: 22 जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठान सोहळा संपन्न झाला होता. त्याच दिवशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनीहि दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी सुंदरकांडाचे पठणही केले होते. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, अयोध्येतील राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा ही संपूर्ण भारत आणि जगासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. एकीकडे प्रभू श्रीरामाची आराधना करायची आहे आणि दुसरीकडे त्यांचा संदेश जीवनात अंगीकारायचा आहे. ते म्हणाले होते की, अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेकनंतर अयोध्येला जाण्यासाठी ज्येष्ठांकडून अर्ज मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रामललाचे दर्शन घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना अयोध्येला नेण्याचा आमचा प्रयत्न असेल.

सध्या, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असलेला आम आदमी पक्ष उत्तर प्रदेशमध्ये आपले अस्तित्व मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. दरम्यान, आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान रामनगरी अयोध्येला भेट देणार आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आज अयोध्येत जाऊन राम मंदिरात पूजा करणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी अयोध्येला भेट देणार असल्याचे आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते सभाजित सिंह यांनी रविवारी सांगितले होते. त्यांनी सांगितले की, दोन्ही पक्षाचे नेते दिल्लीहून विशेष विमानाने सकाळी 11 वाजता अयोध्या विमानतळावर उतरतील आणि राम मंदिरात पूजा करतील.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment