---Advertisement---

अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली; शुगर लेव्हल कमी असल्याची माहिती

by team

---Advertisement---

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीने अटक केली. दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत. शुक्रवारी कोर्टाने त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, केजरीवालांची प्रकृती बिघडल्याची माहिती येत आहे. सूत्रांनी सांगितलं की, ईडी कोठडीमध्ये असलेल्या केजरीवाल यांची शुगर लेव्हल लो झाली आहे. मागच्या काही तासांपासून शुगर खाली-वर येत असल्याची माहिती आहे. केजरीवाल यांचं शुगर लेव्हल ४६ पर्यंत खाली गेलं आहे. अशा पद्धतीने शुगर खाली जाणं धोक्याचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---