सुमित देशमुख
जळगाव : मेहरूण परिसरातील नेहरूंची स्मशानभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्मशानभूमीत आदर्श नगर , मोहाडी गाव , मोहाडी रोड, गणपती नगर , सुप्रीम कॉलनी , एमआयडीसी, शिरसोली रोड , गायत्री नगर, पूर्ण मेहरूण परिसर या परिसरासाठी असलेली ही स्मशानभूमी आहे. मात्र नेहरूंच्या या स्मशानभूमीची खूप मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली असल्याने या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होत आहे. स्मशानभूमीतील अग्नीडाग देण्यासाठी केलेले ओटे, तेथील जाळ्या या सगळ्या तुटलेल्या असून कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी नाही. त्यातच आता स्मशानभूमीत प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारा जवळील दोघं बाजूच्या मधोमध मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत. आणि या खड्ड्यांमधून हा अंत यात्रेचा प्रवास , जो शेवटचा प्रवास मानला जातो. तो प्रवास सुद्धा या खड्ड्यातूनच करावा लागतो .
अंत्ययात्रा नेतांना नागरिकांना अक्षरशः कसरत करावी लागते . हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते . एवढेच नव्हे तर स्मशानभूमीत नेताना त्या अगोदर बाहेर विसावा द्यावा लागतो त्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने विसावा सुद्धा खड्ड्यांमध्ये आणि चिखलामध्येच द्यावा लागतो . त्यामुळे माणसाचा आता शेवटचा प्रवास सुद्धा चिखल आणि खड्ड्यातूनच करावा लागत आहे. हे दृश्य पाहून आता नागरिकांचा प्रशासनावर व लोकप्रतिनिधी वर असलेला विश्वास आता राहिला नाही असा सूर व्यक्त करत नागरिकांकडून नाराजी दर्शवली जात आहे.