तरुण भारत लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामी लढतीत सौदीअ अरब संघाकडून धक्कादायक पराभव झालेल्या अर्जेंटिनाने जबरदस्त पुनरागमन केले. शानदार खेळाच्या जोरावर सलग दोन सामने जिंकताना अर्जेंटिनाने विश्वचषक फुबॉल स्पार्धेच्या ‘क’ गटात अव्वल स्थान पटकाविले. बुधवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने पोलंडला २-० असे नमवले.
उपउपांत्यपूर्व सामन्यात त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल; तर पोलंडसाठी गतविजेते फ्रान्स प्रतिस्पर्धी असतील. मेस्सीने पेनल्टी गमावल्यामुळे पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत असलेल्या या सामन्यात मध्यांतरानंतर अर्जेंटिनाच्या खात्यात गोल जमा झाला. नाहुली मोलिनाच्या पासवर मॅक अलिस्टरने गोल केला. आम्ही सामन्याचे चांगले आकलन केले. त्यानुसार खेळ करताना आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्याचे समाधान मला अधिक आहे, असे स्कोलोनी यांनी सांगितले.