शेअर बाजार: मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 801 अंकांनी घसरून 71,140 वर आला. निफ्टी 215 अंकांनी घसरला आणि 21,522 वर बंद झाला. एफएमसीजी, फार्मा आणि वित्तीय शेअर्समध्ये बाजारात सर्वाधिक विक्री झाली. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली.
शेअर बाजारात मंगळवारी टाटा मोटर्समध्ये मोठी वाढ झाली आणि शेअर्सने 865 रुपयांची पातळी गाठली,बीपीसीएलच्या शेअर्समध्येही दोन टक्क्यांनी वाढ झाली व यासमवेत आयशर मोटर्स आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्स मध्ये एक-एक टक्क्यांनी वाढ झाली. शेअर बाजारातील तेजीत टाटा मोटर्स, बीपीसीएल, आयशर मोटर्स, ग्रासिम इंडस्ट्रीज, अदानी एंटरप्रायझेस, एसबीआय आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचा समावेश होता, तर घसरण झालेल्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्हचे शेअर्स यांचा समावेश होता.