अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची टिका ; एकाच वेळी मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी दिल उत्तर

मुंबई : आज अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पविधिमंडळात सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यामधील उणीवा काढल्या. उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांचा अर्थसंकल्प म्हणजे यांचे कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात, व हा अर्थसंकल्प हंगामी नव्हे तर पूर्ण अर्थसंकल्प आणि घोषणांचा पाऊस होता,अशी टिका केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे ?
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिन्ही नेत्यांची एकी दिसून आली. मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे हा पूर्ण बजेट आणि घोषणांचा पाऊस होता, असे म्हणतात. याचा अर्थ निवडणुका समोर आहेत म्हणून बजेट मांडायचाच नाही का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले अजित पवार ?
तर या टिकला उत्तर देत शिंदेनच्या बाजूला उभ्या असलेल्या अजित पवार यांना राहवले नाही. ते म्हणाले, ज्यावेळी आम्ही दोघं त्यांच्या सरकारमध्ये होतो, तेव्हा उद्धव ठाकरे माझं कौतुक करायचे. अर्थसंकल्पाबाबत बोलताना ते म्हणायचे की, ‘फार छान आहे, फार छान आहे’. आता मी इकडे आहे म्हणून ते वेगळी भूमिका घेत आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना बजेटचे किती ज्ञान आहे, हे उघड करणारा एक किस्सा सांगितला. उद्धव ठाकरे यांनी एकदा केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर एका कार्यक्रमात प्रांजळपणे सांगितले होते की, मला बजेटमधलं काही कळत नाही. त्यामुळे मी बजेटवर काही बोलू शकत नाही. उद्धव ठाकरे यांचे आजचे वक्तव्य पाहता ते लक्षात येते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.