भुसावळ : शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आला. तसेच पुन्हा संबंध ठेवू देण्यास नकार देण्यात आल्याने फोटो, व्हिडिओ व्हायरलची धमकी देण्यात आली. याप्रकरणी 17 वर्षीय पीडितेने शहर भुसावळ पोलिसात तक्रार दिल्यावरून संशयित कन्हैय्या सीताराम हरणे (जुना सातारा, कडू प्लॉट, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पसार झाला आहे. शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणीचे कन्हैय्या सीताराम हरणे या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर सन 2017 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान (फेबु्रवारी 2019, जून 2019, ऑगस्ट 2019, तारीख नक्की नाही) शहरातील एका भागात निर्जनस्थळी अत्याचार करण्यात आला व पुन्हा शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केल्यानंतर फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपीने फोटो व व्हिडिओ व्हायरलची धमकी दिली. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.