भुसावळ : अल्पवयीन मुलीचा मुक्ताईनगर-फैजपूर बसमध्ये विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला सहा महिने शिक्षा व दोन हजारांचा दंड सुनावण्यात आला तर या गुन्ह्यात एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. २५ ऑक्टोबर २०१५ रोजी मुक्ताईनगर बसस्थानकावर मुक्ताईनगर ते फैजपूरदरम्यान बसमध्ये व यापूर्वी दोन वर्षापासून वेळोवेळी मुक्ताईनगर गावातील पीडीता ही अल्पवयीन असतांनाही संशयीत आरोपी शेख शरीफ शेख अजीज व मोहम्मद शेख हारून शेख यांनी संगनमताने पिडीतेचा पाठलाग करीत शिवीगाळ व विनयभंग केला होता.
मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भुसावळ अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी पीडीत बालिका, पीडीतेचे वडील व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर.पी. खंडागळे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.
सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मोहन देशपांडे यांचा प्रभावी युक्तीवाद केला. आरोपी शेख शरीफ शेख अजीज यास सहा महिने सक्त मजुरी व रुपये २ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच दंडातील एक हजार पीडीतेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. संशयीत शेख हारूनची निर्दोष मुक्तता झाली. पैरवी
अधिकारी भीमदास बी.हिरे होते.