तरुण भारत लाईव्ह । ३० सप्टेंबर २०२३। जळगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. शहरातील जोशीवाडा येथे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फूस लावणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जोशीवाडा परिसरात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह राहत होती. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान मुलगी घरात एकटी असताना एका व्यक्तीने तिला आमिष दाखवत अपहरण केल्याचे समोर आले. मुलीच्या घरच्यांनी सर्वत्र शोध घेऊन सुद्धा मुलगी सापडली नसल्याने मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फूस लावणाऱ्या व्यक्ती विरोधात तक्रार केली.
याप्रकरणी रात्री १० वाजता फूस लावणाऱ्या व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन करत आहे.