जळगाव : शहरातील एका भागात वास्तव्यास असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १ जानेवारी घडली होती. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
जळगाव शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्यास आहे. आरोपी हर्षल दीपक सोनवणे (२१ रा. भुसावळ) याने पीडित मुलीला दुचाकीवर बसवून भुसावळ तालुक्यात नेले. दरम्यान, १ जानेवारी रोजी पिडीत मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानुसार संशयित आरोपी हर्षल सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शनिपेठ पोलिसांनी संशयित आरोपी हर्षल सोनवणे याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे हे करीत आहे.