जळगाव : विजांचा कडकडाट…मेघगर्जनेसह वाहणारा सोसाट्याचा वारा…अन् धो-धो पडणारा पाऊस… यामुळे विक्रेते, व्यापाऱ्यांसह नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. जळगाव जिल्ह्यात काल गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडात जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र, याचा फटका जिल्ह्यात अनेक भागांना बसला असून केळीचे पिक जमीनदोस्त झाली आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात ३० नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाटात, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. याचा फटका जिल्ह्यात अनेक भागांना बसला असून, यावल तालुक्यातील मनवेल , थोरगव्हाण, पथराडे, शिरागड शिवारात केळीचे पिक जमीनदोस्त झाली आहे.