जळगाव : अवैध गावठी दारू निर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून चार लाखाची गावठी दारू जप्त केली. तालुक्यातील मौजे देऊळवाडे येथे तापी नदीच्या किनारी व आजूबाजूच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक व्ही. टि. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जळगाव तालुक्यातील मौजे देऊळवाडा या ठिकाणी तापी नदीच्या किनारी परिसरामध्ये (दि. 4) रोजी छापेमारी करून 4 लाख 94 हजार वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एकूण 6 गुन्हे नोंदवले आहे. यामध्ये रसायन (कच्ची दारू)- 20200 ली.गावठी दारू- 222 लिटर जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती व विक्रीवर कारवाईचे सत्र चालूच ठेवले असून एप्रिल 2023 मध्ये 2022 च्या तुलनेत कारवाईमध्ये मोठी वाढ झाली आहे. सदरची कारवाई निरीक्षक विभागीय भरारी पथक जळगांव, निरीक्षक जळगाव, दुय्यम निरीक्षक चोपडा यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.