---Advertisement---

अशोक चव्हाण आजच करणार भाजपमध्ये प्रवेश ?

by team
---Advertisement---

मुंबई: अशोक चव्हाण यांनी काल सकाळी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. चव्हाण यांनी काल बोलताना दोन दिवसांचा वेळ घेऊन ठरवणार असल्याचं म्हटलं होतं.

मिळालेला माहितीनुसार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण आज, भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी साडे बारा वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांची अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश व्हावा, अशी इच्छा होती. मात्र, आजच अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश होऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment