अश्लील चाळ्यांची मुभा देणाऱ्या यु.एस. कॅफेची तोडफोड: आमदार मंगेश चव्हाणांचा पुढाकार

चाळीसगाव : शहरातील हिरापूर रस्त्यावरील नगरपालिका संकुलात यु. एस. कॅफेमध्ये जास्तीचे पैसे आकारून तरुण-तरुणींना अश्लील चाळे करू देण्याची मुभा दिली जात असल्याची माहिती चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना कळताच त्यांनी मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता कफेत पोलिसांसह धडक देत चार तरुण-तरुणींना अश्लील कृत्य करताना पकडले. यावेळी आमदारांनी स्वतः या अनधिकृत कॅफेची तोडफोड केल्याने शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी कॅफेमालक उमाकांत दिलीप अहिरराव (वय २०, रा. जहागीरदारवाडी, चाळीसगाव) याच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात कॉन्स्टेबल गणेश कुंवर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

करण्यात आला.चाळीसगाव शहर पोलिसांना सूचित करीत मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता भेट दिल्यानंतर अश्तीत प्रकार सुरू असत्याचे निदर्शनास आले. यापूर्वीदेखील कॅफेच्या बाबतीत तक्रारी आल्यानंतर आमदारांनी स्वतः कारवाई केली होती, मात्र आजच्या कारवाईत कॅफेच नष्ट करण्यात आला. तरुण-तरुणींना अश्लील चाळे करू देण्यासाठी एक डार्करूम तयार करण्यात आली होती. ही रूमच आमदारांनी नष्ट केली.

अश्लील प्रकार खपवून घेणार नाही
चाळीसगाव शहरात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर हा अनधिकृत कॅफे सुरू होता. त्याकडे जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असल्यास संबंधित नगरपालिका अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई होईल, असे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले.आमदारांनी पुढाकार घेत नष्ट केला कॅफे तरुण-तरुणींना अश्लील चाळे करू देण्यासाठी जास्तीचे पैसे यु.एस. कॅफेचालक आकारत होता. शिवाय या कॅफेनजीक राष्ट्रीय महाविद्यालय असल्याने अनेक तरुण-तरुणी या कॅफेत येत असल्याची माहिती चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाली होती.कोणाच्याही घरची असेना तिच्या इभ्रतीची काळजी घेणे, तिचा सन्मान करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे. त्यामुळे या मुलींची नावे पुढे न करता त्यांच्या पुढील शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको, त्याची खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. चाळीसगाव शहरामध्ये वा परिसरामध्ये असे चुकीचे प्रकार आपल्या लक्षात येत असतील त्यांनी ते माझ्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहनही आमदारांनी केले आहे. आजचं प्रकरण म्हणजे हे चाळीसगाव शहराला लागलेली कीड आहे. असे प्रकार यापुढे सहन केले जाणार नाहीत, गरज पडली तर अशा अनधिकृत बांधकामांवर जेसीबी चालवला जाईल, असेही आमदार चव्हाण यांनी सांगितले.

आमदारांनी पुढाकार घेत नष्ट केला कॅफे
तरुण-तरुणींना अश्लील चाळे करू देण्यासाठी जास्तीचे पैसे यु.एस. कॅफेचालक आकारत होता. शिवाय या कॅफेनजीक राष्ट्रीय महाविद्यालय असल्याने अनेक तरुण-तरुणी या कॅफेत येत असल्याची माहिती चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाली होती.