इस्लामाबाद : पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी असिफ अली झरदारी यांची शनिवारी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय विधानसभांमध्ये शनिवारी अध्यक्षपदासाठी मतदान झाले. पाकिस्तानच्या १४ व्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शनिवारी सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी चार वाजेपर्यंत ते सुरू होते. झरदारी हे पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज या पक्षांचे संयुक्त उमेदवार होते. सुन्नी इत्तेहाद कौन्सिलचे उमेदवार महमूद खान अचकझाई हेही निवडणूक रिंगणात होते.
झरदारी हे विद्यमान अध्यक्ष डॉ. अरिफ अल्वी यांची जागी घेणार आहेत. अल्वी यांची पाच वर्षांची मुदत गेल्या वर्षीच संपुष्टात आली होती. मात्र, जोपर्यंत नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत ते पदावर कायम राहणार आहेत. पाकिस्तानच्या घटनेनुसार राष्ट्राध्यक्षपदाची अप्रत्यक्षपणे मंडळाकडून केली जाते. निवड निवडणूक नॅशनल असेंब्लीच्या संयुक्त सत्रात झरदारी यांनी अध्यक्षपदासाठी मतदान केले. पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे झरदारी पती आहे, तर ‘पीपीपी’चे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांचे वडील आहेत.