अॅपल आज iphone 16 सिरीज लॉन्च करणार, जाणून घ्या किंमत किती?

iphone 16 price : अॅपल कंपनी आज आयफोन 16 या फोनची सिरीज लॉन्च करणार आहे. या फोनची किंमत किती असणार, याची सर्वच ग्राहकांना उत्सुकता लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या आयफोन सिरिजची संपूर्ण जग मोठ्या उत्सुकतनेने वाट पाहात होते.

अॅपल किंपनीकडून ही नवी सिरीज लॉन्च करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भारतात रात्री साडे दहा वाजता हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल. येत्या 20 सप्टेंबरपासून आयफोन 16 सिरीज भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.

इकोनॉमिक्स टाईम्स या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळानुसार आयफोन 16 ची अंदाजे किंमत ही 66300 रुपयांपासून सुरु होऊ शकते. आयफोन 16 पल्स या मोबाईल फोनची किंमत 74 हजार 600 रुपयांपासून सुरु होऊ शकते. आयफोन 16 प्रो या फोनची भारतात किंमत साधारण 91 हजार 200 रुपयांपासून सुरु होऊ शकते. तर आयफोन 16 प्रो मॅक्स हे मॉडेल साधारण 99 हजार 500 रुपयांना मिळू शकते.