---Advertisement---

अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

by team
---Advertisement---

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिलमध्ये पार पडली. त्यानंतर परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समितीची २०२३-२०२८ ची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी (प्रशासन) नरेश गडेकर यांची, उपाध्यक्षपदी (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली, तर कोषाध्यक्षपदी सतीश लोटके यांची निवड झाली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कार्यवाहपदी अजित भुरे यांची निवड झाली आहे. सहकार्यवाहपदी समीर इंदुलकर, दिलीप कोरके आणि सुनील ढगे यांची निवड झाली आहे.  अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ गटाने दणदणीत विजय मिळवला होता, त्याशिवाय कार्यकारी समिती सदस्यांमध्येही ‘रंगकर्मी नाटक समुहातील’ ११ जणांची निवड झाली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा समावेश आहे.

प्रशांत दामले यांना ७५९, सयाजी शिंदे यांना ६३४, सुशांत शेलार ६२३, विजय केंकरे ७०५, विजय गोखले६६४, सविता मालपेकर ५९१, वैजयंती आपटे ५९० आणि अजित भुरे, प्रसाद कांबळे ५६५, सुकन्या मोने यांना ५६७ मते मिळाली आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment