अमरावती: अमरावती येथील सायत हद्दीत आईला मारहाण केल्याच्या कारणावरून मुलाने बापाचा खून केल्याचा प्रकार घडला आहे .मिळालेल्या माहितीनुसार, राजेश श्रीराम मिसाळ रा. सायत असे मृतकाचे नाव आहे. राजेश हे नेहमी पत्नीसोबत वाद घालून तिला मारहाण करीत होते. सोमवारीसुद्धा त्यांनी पत्नीला मारहाण केली.हि बातमी दर्यापूर तालुक्यातील कोकर्डा येथे आजीकडे राहणारा मुलगा आरोपी अंकुश राजेश मिसाळला कळली. आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने अंकुशने थेट सायत गाठले.
घरी पोहोचताच त्याने वडील राजेश यांना त्याचा जाब विचारला. या कारणावरून दोघांत वाद झाला. या वादात अंकुशने वडील राजेश यांच्या डोक्यावर लोखंडी बत्त्याने हल्ला चढविला. त्यात गंभीर जखमी झालेल्या राजेश यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच भातकुली पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पंचनामा करून करून आरोपी अंकुश ला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.