आगीत घराची राखरांगोळी; जळगावातील घटना

जळगाव : शहरातील जुने जळगाव कोळी पेठेत आज सकाळी घराला लागलेल्या आगीत संपुर्ण घर खाक झाले.तलाठी, कोतवाल यांनी घटनास्थळ गाठत आगीचा पंचनामा केला असून झालेल्या नुकसानाची सखोल माहिती घेतली. शॉटसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मिळाल्या माहितीनुसार, नुकसानग्रस्त घरातील रहिवासी, शीतल कडू मराठे (४०) यांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरातील जुने जळगाव कोल्हेवाडा जवळील कोळी पेठेत शितल या मुलगा हेमंत सोबत वास्तव्याला आहे. आज सकाळी आठ वाजेपुर्वी शितल मराठे या देव पुजेसाठी मंदिरात गेल्या होत्या. घरात मुलगा हेमंत झोपलेला असतांना अचानक त्याला श्वात्सोश्वास घेण्यास त्रास होवुन धुराचा वास आल्याने तो झोपेतून उठला.  तेव्हा घरातील फ्रिज जवळून आगीचे लोट उठत होते. तसाच हेमंतने खालच्या मजल्यावरील आजी व मामा यांना मदतीसाठी आरोळ्या मारत बोलावले.  तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले घरातून धुराचे लोट उठत असल्याने परिसरातील तरुणांनी मदतीला धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र, संपूर्ण घर जळू लागल्याने अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले.या आगीत घरातील धान्य, कपडे, अंथरुण पांघरुणासह संपुर्ण साहित्य जळून खाक झाले असून शितल मराठे मंदिरातून परतल्यावर हे दृष्य पाहून त्यांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती कळाल्यावर शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तलाठी राहुल सोनवणे, कोतवाल सुखदेव तायडे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत आगीचा पंचनामा केला असून झालेल्या नुकसानाची सखोल माहिती घेतली. शॉटसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

थो