आचारसंहीता उल्लंघनाच्या 79 हजार हून अधिक तक्रारी दाखल

16 मार्च रोजी सात टप्प्यातील निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती आणि मतदान 19 एप्रिलपासून सुरू होईल, जे 1 जूनपर्यंत चालेल. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून आचारसंहीता उल्लंघनाचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाकडे cVigil ॲपद्वारे 79 हजार हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

बेकायदेशीर बॅनर होर्डिंगबाबत 58,500 तक्रारी दाखल करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे, तर 1,400 तक्रारी पैसे, भेटवस्तू आणि दारूच्या वितरणाबाबत आहेत. तीन टक्के तक्रारी मालमत्तेच्या नुकसानीच्या होत्या. गुंडगिरीच्या 535 तक्रारींपैकी 529 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. निषिद्ध कालावधी नंतरच्या प्रचाराशी संबंधित एक हजार तक्रारी होत्या.

cVIGIL हे मोबाईल ऍप्लिकेशन आहे ज्यावर नागरिकांना राजकीय गैरवर्तनाच्या घटनांच्या तक्रारी करता येतात. मतदान पॅनेलने म्हटले आहे की सीव्हीआयजीआयएल एक प्रभावी साधन बनले आहे आणि निवडणूक पर्यवेक्षण आणि प्रचारातील गोंधळ कमी करण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण झेप आहे.