आजचे राशिभविष्य : कसा जाणार आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?

मेष रास
कलाक्षेत्र प्रसाशकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल. आपलं कर्तुत्व अर्थात स्वतःला सिद्ध कराल. अधिकार प्राप्त होतील. नोकरीत आपल्या कलागुणांना इतराकडून प्रोत्साहन मिळेल. आर्थिक दृष्टीकोनातून परिस्थिती ठिकठाक राहिल. आनंदी दिनमान आहे. काही विशेष नवीन प्रस्ताव येतील.

वृषभ रास
काही घटनामुळे आपल्याला आज मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आर्थिक प्रकरणात सावधानी बाळगा. नोकरीत दुसऱ्यांवर रोष करू नका. स्थित्यंतर होण्याची संभावना आहे. व्यवसाय रोजगारात मोठे परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे. व्यावहारिक समस्यांमुळे त्रस्त रहाल. धैर्याने आणि संयमाने काम करा. शक्यतो प्रवास टाळावेत. अपघात भय संभवते.

मिथुन रास
आज आपण टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यवसायिक विस्ताराच्या दृष्टीने योजना पूर्ण होतील. जनसंपर्क वाढल्याने आपली कामे सुरुळीत पूर्ण होतील. व्यवसायिक स्पर्धेत यशाची संधी आज आहे. दाम्पत्य जीवन सुखी राहील. आर्थिक आवक वाढेल. मानधनात वाढ होईल. मानसन्मान प्राप्त होईल. सामाजिक कार्यात पुरस्कार प्राप्त होईल. खेळाडूंसाठी अनुकूल वातावरण राहिल. दिनमान शुभ आहे.

कर्क रास
आपण केलेल्या कामाची समाधानकारक पोचपावती मिळेल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. आनंदी दिनमान राहील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती होईल. मानसन्मान प्राप्त होईल.

सिंह रास
आपले धैर्य कुंटुंबात व समाजात मानसन्मान मिळवून देणार आहे. नोकरीमध्ये अपेक्षेप्रमाणे बढ़ती किंवा बदली होण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक स्थिती चांगली राहिल. आजच्या दिवशी विशेष फायदा होण्याचे योग आहेत. आकस्मिक धनलाभ होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. आंनदायक वातावरण राहिल.

कन्या रास
बोलण्यातील टीकात्मक वृत्ती टाळा. गैरसमज निर्माण होतील. दिवस धावपळीचा राहील. मानसिक गोंधळ उडालेला असेल. जोडीदाराच्या संततीच्या आरोग्याची चिंता निर्माणहोईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक वाढेल. व्यसनापासुन दुर रहा. अनैतिक मार्गाचा अवलंब करू नका. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही. याची विशेष काळजी घ्या.

तूळ रास
शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी दिवस फायदेशीर आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्न वाढेल. राजकारणात पदप्राप्ती प्रतिष्ठा वाढेलं. विद्यार्थ्यांच्या विद्याभ्यासातील प्रगती पाहुन मन समाधानी होतील. प्रवासातुन लाभ होईल. समाधानी दिवस आहे.

वृश्चिक रास
नविन व्यापार सुरु करण्यासाठी उत्तम दिवस आहे. मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत पद प्रतिष्ठेत वाढ होईल.भावनांवर नियंत्रण ठेवा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत.कुंटुबातील ज्येष्ठ आणि संततीच्या आरोग्याकडे लक्ष दया. आरोग्यावर खर्च वाढणार आहे. व्यक्तिगत पातळीवर वातावरण अनुकूल राहणार आहे.

धनु रास
नोकरीन नवीन योजना फायदेशीर राहतील. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील. काही नवीन भागीदार प्रस्थापित कराल. प्रिय व्यक्तीची भेट होतील. कोर्टकचेरी कायदयाचे वाद असतील तर ते मिटतील. त्यामधून आर्थिक फायदा होईल.

मकर रास
कौटुंबिक पातळीवर संततीविषयी मन चिंताग्रस्त राहील. नोकरीत मनाजोग्या घटना घडणार नाही. विपरित परिणाम दिसतील. व्यवसायात भागीदारासोबत वाद होण्याची शक्यताआहे. अनिष्ट दिनमान आहे. वाहन सावकाश चालवा. प्रवास शक्यतो टाळा.

कुंभ रास
अपूर्ण राहिलेली कामे वेळेत करावी.कामाचा ताणतणाव राहील. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान संभवते.फसवणूकी सारखे प्रकार घडतील. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रीन करावे. विचलित व्हाल. मनात असमाधान आणि असंतोष निर्माण होईल. मोठे व्यवहार टाळावेत. प्रकृतीची काळजी घ्या.

मीन रास
अनेक नवीन संधी नवे मार्ग सापडतील. नोकरदार जोडादाराकडून आपणास सहकार्य लाभेल त्याच्या बढ़ती प्रमोशनचे आज योग आहेत. शासकीय कामकाजास दिवस शुभ आहे. दुरवरचे प्रवास लाभदायक होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. आरोग्य स्वास्थ उत्तम राहील.