Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य, ‘या’ राशीच्या लोकांना होणार धनलाभ! वाचा, तुमच्यासाठी कसा राहील अजचा दिवस

Rashi Bhavishya: अश्विन शुक्ल तृतीया तिथी आज. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी आजचा दिवस कसा राहील. जाणून घ्या आजचे राशी भविष्य.

मेष रास
मित्र आणि शुभचिंतक याच्या माध्यमातून आपल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. नोकरीत प्रगती होण्याचे संकेत मिळतील. मोठ्या तसेच प्रतिष्ठित लोकांशी संबंध वाढतील.

वृषभ रास
नोकरीत या योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. मान- सन्मानाचे योग मिळेल.

मिथुन रास
आर्थिक टंचाई निर्माण होतील. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. खर्चामध्ये वाढ होईल. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. वाहन सावकाश सांभाळून चालवा.

कर्क रास
आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्यांवर सहज मात कराल. नोकरीत स्वतःचे निर्णय महत्वपूर्ण राहतील. सामाजिक कार्यात सक्रीय भूमिका राहील. व्यापार रोजगार चांगला चालेल. उद्योग व्यवसायात यश मिळण्याचे योग आहेत. जोखमीचे कामे फक्त टाळा.

सिंह रास
नोकरीत स्वतःचे निर्णय प्रभावी पद्धतीत मांडा. रोजगारात बदल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नीच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात आर्थिक नियोजानावर सावधानीपूर्वक निर्णय घ्या. मुलाची चिंता सतावेल. व्यसनापासून दूर राहा. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक वादविवाद टाळावेत.

कन्या रास

नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. नोकरीत स्वतःचा निर्णयावर ठाम राहिल्याने आपल्याला प्रतिकूल परिणाम दिसून येतील. अनेक कामात अडथळे निर्माण होतील. सन्मान व किर्ती डागळण्याची शक्यता आहे. खर्च विचारपूर्वक करावा. मनस्ताप हानी होण्याची शक्यता चालूनही आहे.

आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. निंदानालस्ती टाळा. संयमी भूमिकेतुन वाटचाल करावी.

वृश्चिक रास
नोकरीत जबाबदारीच्या कामात सावधानतेने पाऊल उचला. जास्त उत्साह दाखविल्यामुळे जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. भांवडाकडून सहकार्य लाभणार आहे. एकंदरित सामान्य कामासाठी दिवस चांगला राहणार आहे.

धनु रास
नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील. प्रयत्न केल्यास थकीत रक्कम प्राप्त होईल.

मकर रास
घरामध्ये लक्ष दिले असता घरातील समस्या सहजा सहजी दूर होतील. व्यापार रोजगारात लग्न स्थानातील भ्रमणामुळे अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. मौजमजा करण्याकडे कल राहील. वाद विवाद टाळावेत. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. परदेश भ्रमण घडेल.

कुंभ रास
विवेकबुद्धीने काम करा. अन्यथा हानी संभवते. घरात एखाद्याशी मतभेद निर्माण होतील. शुभकार्यात पैसे खर्च होतील. व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळयाची शक्यता आहे. पत्नीच्या सहकार्याने काही योजनावर कार्य सुरु कराल.

मीन रास
अनुकुल स्थिती राहणार आहे. नोकरीत वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. विचाराअंतीच निर्णय घ्या. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिनमान आहे. संततीकडून समाधान लाभेल. परदेशगमनाची शक्यता आहे. लाभदायक दिवस असून प्रवासातून लाभ होतील.