आजपासून भाजपचे नवीन ‘अभियान’ सुरू, या अभियान अंतर्गत मिळेल ही सुविधा

अयोध्या:  अयोध्येतील रामलल्ला विराजमान झाल्यानंतर पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. २३ जानेवारीपासून सर्वांसाठी दर्शन खुले झाले आहे. देशातूनच नाही तर परदेशातून देखील लोकं दर्शनाला येत आहेत. आज दर्शनाचा दुसरा दिवस आहे.

भाजपच्या ‘श्री रामजन्मभूमी दर्शन’ अभियानाला आजपासून सुरुवात होणार आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज याची सुरुवात केली आहे. या अभियाना अंतर्गत प्रत्येक लोकसभेतून 6 हजार भाविकांना रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला नेण्यात येणार आहे. ही मोहीम २५ मार्चपर्यंत चालणार आहे. या अभियानात केवळ एक हजार रुपयांत अयोध्येपर्यंत प्रवास, निवास आणि दर्शनाची सुविधा दिली जात आहे.

तुम्हालाही रामलल्लाचे दर्शन घ्यायचे असेल तर केवळ एक हजार रुपये खर्चून ही सुविधा मिळू शकते. भाजपने आपल्या सर्व मंत्री,खासदार, आमदार, आणि संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपापल्या मतदारसंघातील ज्या लोकांना रामाचे दर्शन घ्यायचे आहे, अशा सर्वांना अयोध्येला नेण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर भाजपने अयोध्येत 25 हजार भाविकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.ही मोहीम २५ मार्चपर्यंत चालणार आहे.