आज पुन्हा स्वस्त झाले सोने-चांदी, जाणून घ्या आजचे दर

सोन्या चांदीच्या भावात संप्टेंबर महिन्यात मोठया प्रमाणात भाव वाढ झाल्याचे समोर आले. पुढच्या महिन्यात देखील दोन्ही धातूच्या भावात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. काल 26 सप्टेंबरला सराफा बाजार लाल चिन्हाने उघडला.सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहिला मिळाली आहे.

हे आहेत जळगाव नगरीतील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 54,350 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 59,400 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर 72,8000 रुपयावर आला आहे.

चार प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे दर?
राजधानी दिल्लीत सोन्याचा (22 कॅरेट) भाव 53,863 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे. तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 58,760 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर राजधानीत चांदीचा भाव 71,600 रुपये प्रति किलो आहे. मायानगरी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 53,955 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा भाव येथे 71,720 रुपये प्रति किलो आहे.

कोलकातामध्ये सोनं (22 कॅरेट) 53,882 रुपये प्रति दहा ग्रॅम विकलं जातंय, तर इथे 24 कॅरेट सोनं 58,780 रुपये प्रति दहा ग्रॅमनं विकलं जात आहे. कोलकात्यात चांदीचा भाव 71,630 रुपये प्रति किलो आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,102 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार होत आहे. तर चेन्नईमध्ये चांदीची किंमत 71,920 रुपये प्रति किलो आहे.