आठवड्यातील दुसऱ्या ट्रेडिंग सत्रातही बाजारात घसरण, निफ्टी 22,000 च्या पातळीवर

शेअर बाजार : आठवड्यातील दुसरे ट्रेडिंग सत्रही गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक सुरु झाले. शेअर बाजाराच्या सुरुवातीला बँका आणि रिअल्टी क्षेत्राच्या घसरणीमुळे बाजार लाल रंगात सुरू झाला.

NSE चा निफ्टी 31.85 अंकांच्या किंचित घसरणीसह 22,090 च्या पातळीवर उघडला. तर BSE सेन्सेक्स 66.60 अंकांच्या वाढीसह 72,723 च्या पातळीवर उघडला. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 33 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 17 समभाग घसरणीत आहेत. TCS हा 1.30टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे ग्रासिम 1.10 टक्क्यांनी तर सिप्ला 1 टक्क्यांनी वाढले आहे. आयशर मोटर्स 0.88 टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंट 0.80 टक्क्यांनी वधारले.