---Advertisement---

आठवड्याभरात सोने 900 रुपयांनी घसरले, जळगावात काय आहे आजचा भाव

by team
---Advertisement---

जळगाव प्रतिनिधी | सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण दिसून आलीय. आठवड्याभरात सोने ९०० रुपयांनी घसरले असून त्यामुळे सोन्याचा भाव ६२ हजाराच्या घरात आला आहे. दुसरीकडे चांदी दरात फारसा बदल दिसून आला नाहीय.

खरंतर सोने-चांदीच्या दरात सतत बदल होत असतात. तुलनेत सोने हा धातू अधिक संवेदनशिल असतो म्हणजेच सोन्याचे दर अधिक बदलत असतात. जळगावच्या सुवर्णनगरीत फेब्रुवारी महिन्याच्या १ तारखेला सोन्याचे प्रती तोळ्याचे दर ६३४०० तर चांदीचे प्रती किलोचे दर ७३००० हजार रुपये होते. गेल्या १५ दिवसात सोने १२०० रुपयाने तर गेल्या आठवड्याभरात सोने ९०० रुपयांनी घसरले.

गेल्या आठवड्यात शनिवारी सोन्याचा दर ६३,१०० रुपयावर होता. तो आज शनिवारी विनाजीएसटी ६२,२०० रुपये प्रति तोळ्यावर आला आहे. दुसरीकडे गेल्या पंधरा दिवसात चांदी १००० रुपयांनी घसरली आहे.आज चांदीचा एक किलोचा भाव विनाजीएसटी ७२,००० रुपयावर आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment