आता अत्याचार करणाऱ्यांची खैर नाही, पीएम मोदींनीचं सांगितलं काय करायचं ?

जळगाव : कोलकाता आणि त्यापाठोपाठ बदलापूर, सिन्नरमधील अत्याचाराच्या घटनांचा महाराष्ट्रभरात निषेध केला जात आहे. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जळगावातील ‘लखपती दिदी’ कार्यक्रमात बोलताना महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?
महिलांवर अत्याचार हे पाप आहे. महिलांवर अत्याचार करणारे वाचले नाही पाहिजे. हॉस्पिटल, शाळा किंवा पोलीस व्यवस्था जिथे निष्काळजीपणा होत असेल तिथे कारवाई व्हायला पाहिजे. वरून खालीपर्यंत मेसेज थेट जायला पाहिजे.

सरकार येतील, जातील, पण जीवनाची आणि नारीची रक्षा सरकार म्हणून आपले दायित्व आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यावर कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी कायदे करत आहोत, असं मोदी म्हणाले.

पूर्वी वेळेवर एफआयर होत नव्हता. अशा अनेक अडचणींना आम्ही भारतीय न्याय संहितामध्ये पर्याय दिला आहे. पीडित महिलेला पोलीस स्टेशनमध्ये जायचं नसेल तर ती ई-एफआयर करू शकते. अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारासाठी फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा नव्या कायद्यात आहे, असं मोदी म्हणाले.