आता मुलांच्या इंस्टांग्राम अकाउंट्स वर असणार पालकांची नजर , मेटा चा नवीन नियम

हल्ली मोबाईल आणि सोशल मीडिया यामध्येच मुलं गुंतलेली असतात. अशावेळी पालकांना नेमकं काय चाललंय ते कळत नाही. पण आता मेटा इंस्टाग्राम ने यावर चांगलाच मार्ग काढला आहे.

इंस्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जगभरातील लाखो लोक वापरतात. याचा वापर फोटो, व्हिडीओ आणि रील्स पोस्ट करण्यासाठी केला जातो. केवळ प्रौढच नाही तर मुलेही या प्लॅटफॉर्मचा भरपूर प्रमाणात वापर करतात. दरम्यान, मेटाने इन्स्टाग्रामवरील १८ वर्षांखालील मुलांच्या अकाऊंट प्रायव्हसीवर पालकांचेही नियंत्रण असावे यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नवीन बदलामुळे सोशल मीडियाची नकारात्मक बाजू दूर करण्यासाठी करण्यात आला आहे.

मेटाने दिलेल्या अहवालानुसार, आता इन्स्टाग्राम च्या  “तीन अकाउंट्स” मध्ये बदल केले आहे. जे डिफॉल्टमधून प्रायव्हेट अकाऊंट झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या अकाऊंट्सच्या युझर्सना फक्त त्याच अकाऊंट्सला मॅसेज किंवा टॅग केलं जाऊ शकतं ज्यांना ते फॉलो करतात. किंवा आधीपासून त्यांना फॉलो करत आहेत. तसेच सेंसिटिव कंटेंट सेटिंग्सला रिस्ट्रिक्टिव सेटिंवर सेट करु शकता.

पालक ठेवणार नियंत्रण
१६ वर्षांखालील युझर्स केवळ पालकांच्या परवानगीने डीफॉल्ट सेटिंग्ज बदलू शकतात. सेटिंग्जचा एक सेट देखील मिळेल जेणेकरून ते पाहू शकतील की, त्यांची मुले कोणाशी बोलतात. एवढंच नव्हे तर ते इंस्टाग्राम वर किती वेळ घालवत आहेत. मेटामधील हा बदल मुलांना इंस्टाग्राम योग्य प्रकारे वापरण्यास मदत करू शकतो.

इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर गुन्हे दाखल
सोशल मीडियाच्या व्यसनाधीनचे प्रमाण इतके वाढले आहे की, शाळेतील मुलं देखील यामध्ये अ़डकले आहेत. एवढंच नव्हे तर जिल्ह्यातील शाळांच्या वतीने मेटा च्या इंस्टाग्राम आणि गुगल च्या यूट्यूब वर यापूर्वीच अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी, ३३ अमेरिकन राज्यांनी कंपनीच्या प्लॅटफॉर्मच्या धोक्यांबद्दल लोकांची दिशाभूल केल्याबद्दल कंपनीवर खटला दाखल केला.