आता शरद पवार गटात नाराजीनाट्य! रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

xr:d:DAFtd8oCXa8:2684,j:3822855005494886419,t:24041407

जळगाव :  मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस रावेर लोकसभा शरद पवार पक्षातर्फे श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी समर्थकांसह या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारीबाबत शब्द दिला होता.

मात्र अचानक उमेदवारी उद्योजक श्रीराम पाटील यांना देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे चौधरी यांच्या समर्थकांनी संतप्त भावना व्यक्त करीत आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. पदाधिकाऱ्यांनी राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सादर केल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर, युवराज पाटील, माजी गटनेता उल्हास पगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारमाजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारीबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शब्द दिला होता.

मतदारसंघात कामाला लागण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या. यानंतर मात्र अचानक उमेद्वारी उद्योजक श्रीराम पाटील यांना देण्यात आली. यामुळे माजी आमदार संतोष चौधरी यांचे भुसावळ विभागातील समर्थक संतप्त झाले आहेत. प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी गटनेता उल्हास पगारे, युवराज पाटील आदींसह यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव आदी भागातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे अचानक उमेदवार बदल केल्यामुळे माजी आमदार संतोष चौधरी हे १५ रोजी संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत सर्व कार्यकत्यांसोबत चर्चा करुन लोकसभा निवडणुकीबाबत पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत