आता होणार दंगल… भारत-जॉर्जीयात तेही जळगावात

जळगाव : शहराचे ग्रामदैवत वारकरी संप्रदायाची परंपरा असलेले श्रीराम मंदिर संस्थानतर्फे शुक्रवारी श्रीराम रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या श्रीराम रथोत्सवानिमित्त रविवार 6 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते नऊ वाजेदरम्यान जळगाव शहरातील जी.एस.मैदानावर कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय जळगाव शहरात प्रथमच भारताचे पुणे येथील पैलवान भारत मदने विरूद्ध जॉर्जीया येथील पैलवान टॅडो या कुस्तीपटूसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती होत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी जळगाव शहरातील हि कुस्ती लक्षवेधी ठरणार असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, कुस्ती उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख दीपक जोशी यांनी केशव स्मृती प्रतिष्ठान व श्रीराम मंदिर संस्थानतर्फे केशवस्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. श्रीराम मंदिर संस्थानतर्फे रथोत्सव आटोपल्यानंतर कुस्त्यांच्या दंगलीची परंपरा संत जाप्पा महाराज यांच्या काळापासून सुरू आहे. मधल्य काळात ही परंपरा खंडीत झाली. ही परंपरा केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे राखत गेल्या सात वर्षांपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या कुस्ती महोत्सवात राज्यातील पुणे, संभाजीनगर, खंडवा, धुळे, कोल्हापूर, भोपाळ, बारामती यासह जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, भुसावळ, एरंडोल, जामनेर, पारोळा यासह मध्यप्रदेश अन्य विविध भागातून मल्ल यात सहभागी होत आहेत. या कुस्ती महोत्सवाचे यंदाचे वैशिष्ठ म्हणजे प्रथमच आंतरराष्ट्रीय कुस्ती शहरात रंगणार आहे. ’भारत विरूद्ध जॉर्जिया’ अशी ही कुस्ती लक्षवेधी ठरणार आहे. या कुस्ती दंगल प्रसंगी यांचेसह अन्य

मुलींचे कुस्ती लक्ष वेधणार

या महोत्सवाचे वैशिष्ट म्हणजे मुलींची कुस्ती लक्ष्यवेधी ठरणार आहे. गेल्या तीन वर्षापासून या महोत्सवात मुली देखिल यात सहभागी होत असतात. यात प्रामुख्याने खंडवा (म.प्र.). एरंडोल, अकोला, चाळीसगाव, धरणगाव येथील मुलींचा सहभाग रहाणार आहे. कुस्त्यांची दंगल यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील, आखाडा जोड प्रमुख सुनील शिंदे, कार्याध्यक्ष राहूल वाघ, उपाध्यक्ष दिलीप कोळी, सचिव दीपक गवळी, माधवराव कुलकर्णी, डॉ. शांताराम सोनवणे, विजय वाडकर, चत्रभूज सोनवणे, दत्तू भामरे आदी पदाधिकारी परिश्रम घेत असून केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरतदादा अमळकर, जळगाव जनता बँकेचे अनिल राव आदी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. यावेळी सचिव रत्नाकर पाटील, दिपक जोशी, कुस्ती आखाडा समिती अध्यक्ष बापूसाहेब पाटील, सुनिल शिंदे, राहुल वाघ, प्रशांत जगताप, अनिल माकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन आणि आभार सागर येवले यांनी मानले.