मुंबई : दिशा सालियन आणि सुशांत सिह राजूपत यांचा मृत्यू मुळे राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधीपक्ष एकमेकांवरती आरोप करत आहे, अश्यातच भाजपचे नेते नारायण राणे यांनी शनिवारी दावा केला की शिवसेना नेते आदित्य ठाकरे दिशा सॅलियनच्या मृत्यूच्या बाबतीत निश्चितच तुरूंगात जातील.या प्रकरणी मुंबई पोलिस तपास करत आहे.
माजी केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, मी आधीच सांगितले आहे की, सुशांत सिंग आणि दिशा सॅलियन या दोघांची हत्या करण्यात आली आहे. जेव्हा दोघांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे सरकार होते आणि त्यांची हत्या करण्यात आली. मी त्यावेळी असेही म्हटले होते की यात एक मंत्री यात सामील आहेत. यापूर्वी कोणतीही चौकशी झाली नव्हती आणि आता चौकशी केली जात आहे. आता सत्य प्रकट होईल. आदित्य ठाकरे नक्कीच तुरूंगात जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 1 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे माजी व्यवस्थापक दिशा सॅलियन यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तीन -सदस्यांची विशेष तपासणी पथक (एसआयटी) स्थापन केली आहे.