Update Aadhaar Online: केंद्र सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली आहे. आता तुम्ही 14 जूनपर्यंत आधार कार्ड अपडेट करू शकाल. सध्या त्याची अंतिम तारीख १४ मार्च होती. UIDAI ने सोशल मीडिया पोस्टद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. ही मोफत सेवा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध असेल. UIDAI लोकांना त्यांची कागदपत्रे अपडेट करण्याची पूर्ण संधी दिली आहे.
अशा प्रकारे आधार ऑनलाइन अपडेट करा
सर्वप्रथम तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटवर जा. यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि ओटीपीच्या मदतीने लॉग इन करावे लागेल.यानंतर, ओळख आणि पत्त्याशी संबंधित माहिती तुमच्या प्रोफाइलवर दिसू लागेल.तुमचा तपशील बरोबर असल्यास Verify वर क्लिक करा. माहिती बरोबर नसल्यास, नवीन ओळखपत्र अपलोड करण्यासाठी पर्याय निवडा. मग अपलोड करा. त्याचप्रमाणे, तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून डॉक्युमेंट्स निवडावा लागेल. सबमिट केल्यानंतर अपलोड करा.