आधी शिवसेना,नंतर राष्ट्रवादी आणि आता काँग्रेसमध्ये मोठी फूट; अनेक राजकीय योद्धे हादरल्याचं चित्र

महाराष्ट्र: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडाले आहेत त्यांच्या या निर्णयामूळे महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर काही तासांनी माजी आमदार अमर राजूरकर यांनीही राजीनामा दिला. परिणामी महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत पक्षात शांतता आहे. एकाच दिवसात दोन नेते पक्षापासून वेगळे झाले आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढेच नाही तर त्यांच्यासोबत 10 ते 12 आमदारही राजीनामे देण्याच्या शर्यतीत असल्याचा दावा केला जात आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सातत्याने धक्के बसत आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेदानंतर शिवसेनेत फूट पडली आणि शिंदे त्यांच्या सोबत चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले व त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पडले. भाजप आणि शिंदे यांनी मिळून सरकार स्थापन केले.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यापासून दुरावा करत राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांसह पक्षातून बाहेर पडत भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

आधी शिवसेनेत फूट पडली, नंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. आता काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे, म्हणजे महाविकास आघाडी सातत्याने कमकुवत होत आहे. राज्यातील तिन्ही मोठ्या पक्षात फूट पडल्यानंतर भाजपने त्यांना आपल्या सोबत घेऊन आपली बाजू भक्कम केल्याचे बोलले जात आहे. यामुळे अनेक राजकीय योद्धे हादरल्याचही चित्र दिसत आहे.