---Advertisement---

आनंदाची बातमी! मध्य रेल्वे विशेष गाड्यांच्या ९० फेऱ्या वाढवल्या

by team
---Advertisement---

भुसावळ : आगामी उन्हाळी सुट्या व रेल्वे प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन पुढील विशेष गाड्यांच्या सेवेचा विस्तार करण्यात आला. त्यात ट्रेन क्रमांक ०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर द्वि-साप्ताहिक गाडीला आता ३० में पर्यंत (३० फेऱ्या) मुदतवाढ देण्यात आली तर ट्रेन क्रमांक ०२१४० नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाडीला १ जूनपर्यंत (३० फेया) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

ट्रेन क्रमांक ०२१४४ नागपूर- पुणे साप्ताहिक विशेष गाडीला ३० मे (१५ फेऱ्या) पर्यंत तसेच ट्रेन क्रमांक ०२१४३ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाडीला ३१ मे (१५ फेऱ्या) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. वर नमूद केलेल्या गाड्यांची वेळ, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणतेही बदल करण्यात आला नसत्याचे कळवण्यात आले आहे. रेल्वे प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment